Revdanda Bank Bharti 2024 : रेवदंडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; लगेच अर्ज करा!!

Revdanda Bank Bharti 2024

Revdanda Bank Bharti 2024 : रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि. मध्ये एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरली जाणारी विविध पदे पुढील प्रमाणे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक केंद्रीय कार्यालय, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख आणि कनिष्ठ लिपिक.या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे.

शैक्षणिक पात्रता महत्त्वाच्या तारीख, व इतर आवश्यक माहिती खालील जाहिरातीत काळजीपूर्वक वाचावी. बँक अंतर्गत नोकरी करण्याची ही चांगली संधी उमेदवारांना मिळाली आहे.या संधीचा संपूर्णपणे लाभ घेऊन बँकेत नोकरी मिळवावी विविध भारतीच्या माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.freshbharti.com

रेवदंडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती वयाची अट

रेवदंडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती मध्ये 22 ते 35 वर्षे वयाची अट दिलेली आहे.वयोमार्यादाची संपूर्ण माहिती पाहण्याकरिता खालील लिंकवरून मूळ जाहिरात वाचावी.

रेवदंडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती अर्जाची फी

रेवदंडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती मध्ये अर्जाचे शुल्क सर्व उमेदवारांना रुपये.500+ 18% जी.एस.टी सह एकूण रू.590/-आणि परीक्षा शुल्क रुपये 950.+ 18% जीएसटी सह असे एकूण 1,121/- रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.अर्ज शुल्काच्या परीक्षा शुल्काच्या संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये बघू शकता.

रेवदंडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.शिक्षण पात्रता

रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांच्या एकूण 08 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव हे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक केंद्रीय कार्यालय, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख आणि कनिष्ठ लिपिक. आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार खालील दिलेल्या तक्त्यामध्ये बघून पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील पूर्ण मूळ जाहिरातच्या लिंक वरून मूळ जाहिरात वाचावी.

पदनामआवश्यक शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीCIIB/डिप्लोमा इन बँकिंग आणि फायनान्स/डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा समतोल्य बँकिंग/को-ऑपरेटिव्ह बँकिंग किंवा CA/CS/ICWA/MBA (Finance) किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असावी.
व्यवस्थापक केंद्रीय कार्यालयमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
एम एस सी आय टी किंवा समकक्ष संगणक कोर्सचे प्रमाणपत्र आवश्यक.
माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुखबी.एससी संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान एम एस सी आय टी किंवा समक्ष संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र आवश्यक
कनिष्ठ लिपिकमान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी
एम एस सी आय टी किंवा समकक्ष संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
20.11.2024 रोजी शैक्षणिक पात्रता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
जर परीक्षेचा निकाल फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट झालेला असेल किंवा वेबसाईट आधारित प्रमाणपत्र प्रदान केले गेले असतील, तर उमेदवारांनी त्यासंदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करावे लागतील आणि त्यावर विद्यापीठातील अधिकृत अधिकाऱ्यांनी उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाला असल्याची तारीख दर्शवून सही करणे आवश्यक राहील.

रेवदंडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अर्ज पद्धती

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होण्यापर्यंत सुरू राहिला पाहिजे, तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश आणि माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवारांची राहील, तसेच ई-मेल आयडी व संदेश वाहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना फेडरेशन बँक जबाबदार राहणार नाही.

उमेदवारांनी अर्ज करताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज करायचा आहे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे व इतर प्रमाणपत्र पुरावे जोडण्याची आवश्यकता नाही.ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण खरी व योग्य माहिती भरणे आवश्यक राहील.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करीत असताना काही चुका झाल्यावर भरतीच्या टप्प्यावर अर्ज नाकारला गेला तर त्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक करावा.

इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्णपणे भरून वैध ई-मेल पत्त्यासह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसात सदर अर्जाचे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी आणि परीक्षा शुल्क भरावी परीक्षा शुल्क न भरणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.

रेवदंडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.निवड पद्धती

कनिष्ठ लिपिक पदासाठी उमेदवारांची 100 गुणांची बहूपर्यायी आहे प्रश्नांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक केंद्रीय कार्यालय व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख पदांसाठी भरती प्रक्रिया बँकेमार्फत राबविली जाईल आणि पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल.

Revdanda Bank Bharti Notification 2024

ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची दिनांक : 06 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज सुरु झाले आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 20 नोव्हेंबर 2024 आहे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आत अर्ज सादर करावे.

पूर्ण मूळ जाहिरातयेथे पहा
अधिकृत संकेतस्थळभेट द्या
ऑनलाईन अर्ज येथे करा

Leave a Comment