RCSMGMC Kolhapur Bharti 2024 : RCSMGMC कोल्हापूर येथे 102 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित!!

RCSMGMC Kolhapur Bharti 2024

RCSMGMC Kolhapur Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधिनिस्त संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वप्रचार रुग्णालय कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील आणि कक्षेतील रिक्त पदांच्या भरती करिता सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रिक्त पदांचे नाव गट ड वर्ग- ४ प्रयोगशाळा परिचर, मदतनीस, शिपाई, क्ष किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचार, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, कक्षसेवक हे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील पूर्ण मूळ जाहिरात च्या लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात बघू शकता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरती मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे तसेच ऑनलाईन अर्जाची सुरुवात 31 ऑक्टोबर 2024 तारखेपासून होत आहे. नोकरीच्या अपडेट्स पाहण्याकरिता रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.freshbharti.com

RCSMGMC कोल्हापूर भरती अर्ज शुल्क

RCSMGMC कोल्हापूर भरती मध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 1000/- अर्ज शुल्क लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 900/-रुपये भरावे लागेल.

RCSMGMC कोल्हापूर भरती वयोमर्यादा

RCSMGMC कोल्हापूर भरती मध्ये सर्वसाधारण (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 व मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे वयोमर्यादेची अट दिलेली आहे.

RCSMGMC कोल्हापूर भरती शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधिनिस्त संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वप्रचार रुग्णालय कोल्हापूर मध्ये रिक्त पदांच्या एकूण 102 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.

रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे गट ड वर्ग- ४ प्रयोगशाळा परिचर, मदतनीस, शिपाई, क्ष किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचार, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, कक्षसेवक आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे उमेदवार कोणत्याही शासनमान्य प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा 10वी पास असणे आवश्यक आहे (सर्व पदांसाठी शैक्षणिक अर्हता सामाईक)
प्रयोगशाळा परिचर या पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी (विज्ञान विषयासह) उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी 10वी उत्तीर्ण असलेल्या किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन किंवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांसाठी अर्ज करू शकता.

RCSMGMC कोल्हापूर भरती अर्ज प्रक्रिया

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहे.
अर्ज करताना त्यामध्ये सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे पासपोर्ट आकारातील फोटो उमेदवारांची सही अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेला तारखेला वेळेवर बंद होईल त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज आणि परीक्षा शुल्क भरायचे आहे.

अर्ज भरण्याची टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणारे संबंध बटणावर क्लिक केल्यानंतर Pay Fees या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा मुख्यपृष्ठावरील माझे खाते या सदराखालील अर्ज केलेला पदाच्या यादीतील Fees Not Paid अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात समोरील Pay Now या लिंक वर क्लिक करून परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क खालील पद्धतीने भरता येईल ऑनलाइन पद्धतीने- परीक्षा शुल्क भरण्यासाठी प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे परीक्षेचे शुल्क अदा करता येईल.

परीक्षा शुल्क भरताना बँक खात्यातून परीक्षा शुल्क रक्कमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा भरणा यशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याचा संदेश ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरून किंवा खात्यातून लॉग आऊट करू नये.

परीक्षा शुल्काचा भरला केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइल परीक्षा शुल्काचा भरणी यशस्वी झाला आहे किंवा त्याची स्थिती लगेचच दिसेल.
खात्यातून लॉग आऊट होण्यापूर्वी परीक्षा शुल्कायशस्वीपणे भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यापार पूर्ण झाला असल्याची खात्री करून घ्यावी.

परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरायची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने अयशस्वी ठरल्यास या संदर्भातील तक्रारींची दखल घेण्यात येणार नाही.
अर्ज परिपूर्ण भरून अर्जाचे शुल्क यशस्वीरीत्या भरल्यानंतर अर्जाची प्रत भविष्यातील संदर्भासाठी सांभाळून ठेवावी.

RCSMGMC कोल्हापूर भरती निवड प्रक्रिया

RCSMGMC कोल्हापूर भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या कामगिरीवरून करण्यात येईल.
गट वर्ग चार सम कक्ष पदांसाठी माध्यमिक शालांत परीक्षा ही कमीत कमी अर्थ असल्याने सदर पदांच्या परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांत परीक्षा एसएससी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.

मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शाळांत परीक्षेच्या एसएससी च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी 50% गुण ठेवून एकूण 200 गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.

निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिलेल्या मूळ जाहिरातीत नमूद आहे. पूर्ण माहिती बघण्यासाठी खालील पूर्ण मूळ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून माहिती बघू शकता.

RCSMGMC Kolhapur Recruitment Notification 2024

ऑनलाईन अर्जाची सुरूवात होण्याची तारीख : 31 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज सुरू होईल.

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहील दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज ऑनलाईन पाठवावे.

पूर्ण मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे करा अर्ज

Leave a Comment