NIACL Maharashtra Bharti 2024 : द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि. मुंबई येथे 170 रिक्त जागांसाठी भरती जाहीर ऑनलाईन अर्ज करा

NIACL Maharashtra Bharti 2024

NIACL Maharashtra Bharti 2024 : द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड मुंबई मध्ये स्केल संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. एकूण 170 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित केली आहे.रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे स्केल संवर्गातील प्रशासकीय अधिकारी (जनरललिस्ट) प्रशासकीय अधिकारी (लेखा) असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर मूळ जाहिरातीच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड मुंबई भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.भरती अपडेट्स जाणून घेण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.freshbharti.com

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी लिमिटेड मुंबई अर्ज शुल्क

द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड मुंबई भरती अर्ज करण्यासाठीचे सर्वसाधारण उमेदवारांसाठी रुपये 850/- अर्ज शुल्क लागणार आहे. आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना रु.100/- लागणार आहे.

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी लिमिटेड मुंबई वयोमर्यादा

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी लिमिटेड मुंबई भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना उमेदवारांना 21 ते 30 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी यांना 05 वर्ष आणि ओबीसी (नॉन क्रिमिलेयर ) प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्ष सूट दिलेली आहे.(शासकीय नियमांनुसार) वयोमार्यादेची पूर्ण माहिती पाहण्याकरिता मुळ जाहिरात वाचावी.

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी लिमिटेड मुंबई शैक्षणिक पात्रता

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत एकूण 170 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे रिक्त पदांचे नाव हे प्रशासकीय अधिकारी (जनरललिस्ट) प्रशासकीय अधिकारी (लेखा) असे आहे या पदांकरिता शैक्षणिक पत्राता खालील टेबल मध्ये दिलेली आहे उमेदवारांनी पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी (जनरललिस्ट)सरकार मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर
प्रशासकीय अधिकारी (लेखा)चार्टर्ड अकाउंटंट (ICAI) कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट आणि ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा एमबीए फाईनान्स पीजीडीएम फायनान्स/एम कॉम असणे आवश्यक आहे.

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी लिमिटेड मुंबई अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक माहिती.
अर्ज नोंदणी
अर्ज शुल्क भरणे
कागदपत्रे स्कॅन आणि अपलोड करणे.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्र स्कॅन करून आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा पांढऱ्या कागदावर व हस्तलिखित घोषणापत्र तयार ठेवावे आणि सुरू असलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी असावा.

स्वघोषणामध्ये लिहिण्याचा मजकूर मूळ जाहिरातीमध्ये दिलेला आहे स्वघोषणापत्र फक्त इंग्रजी भाषेतूनच लिहायचे आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कंपनीच्या वेबसाईट भरती विभागात जाऊन www.newindia.co.in आणि ऑनलाईन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा नवीन स्क्रीन उघडेल अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणी येथे क्लिक करा टॅब निवडा आपले नाव संपर्क तपशील व ईमेल आयडी प्रविष्ट करून एक तात्पुरती नोंदणी सिस्टीम द्वारे जनरेट केली जाईल.

दिलेल्या संपर्क तपशीलावर एक एसएमएस प्राप्त होईल ज्यामध्ये उमेदवारांना नोंदणी क्रमांक व पासवर्ड पाठविण्यात येईल. उमेदवारांना एकावेळी पूर्ण अर्ज भरायचा नसल्यास सेव्ह&नेक्स्ट या सुविधेचा वापर करावा.

ऑनलाइन अर्जाची फी भरणे

उमेदवारांनी अर्ज यशस्वीरित्या पूर्ण भरल्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग कॅश कार्ड मोबाईल वॉलेट द्वारे अर्जाची शुल्क भरता येणार आहे.अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण करून एक पावती तयार होईल.
अर्ज शुल्क भरल्याची पावती व अर्जाची प्रत सुरक्षित ठेवावी.

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी लिमिटेड निवड प्रक्रिया

उमेदवारांना द न्यू इंडिया आश्वासन कंपनी लिमिटेड मुंबई मध्ये निवड होण्यासाठी खालील प्रक्रियेतून जावे लागणार आहे.

  • ऑनलाईन प्रिलीम्स लेखी परीक्षा
  • ऑनलाईन मुख्य लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी लिमिटेड निवड प्रक्रिया विषयी संपूर्णपणे माहिती पाहण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघून निवड प्रक्रियेची माहिती वाचावी.

The New India Assurance Co.Ltd Mumbai Notification 2024

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 10 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर ऑनलाईन नोंदणी व अर्ज लिंक बंद होईल या तारखेच्या आत इच्छुक व पात्र उमेदवारांनी पदांसाठी अर्ज करायचे आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज अर्ज येथे करा

Leave a Comment