Mahavitaran Gondia Bharti 2024 : महावितरण गोंदिया अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महावितरण गोंदिया मध्ये वर्ष 2024-25 करिता शिकाऊ उमेदवार वीजतंत्री, तारतंत्री, कोपा या पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे एकूण 85 रिक्त जागांसाठी भरती होत आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. 85 रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. शैक्षणिक पात्रता माहिती पूर्ण पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. महावितरण गोंदिया मध्ये भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवाराकडून या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही शेवटच्या तारखेला अर्ज सादर करावे. महावितरण गोंदिया मध्ये काम करण्याची उमेदवारांना ही चांगली संधी प्राप्त झाली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ करून घ्यावा. नोकरी विषयक नवीन अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.freshbharti.com
महावितरण गोंदिया भरती अर्ज शुल्क
महावितरण गोंदिया भरती अर्ज करण्याचे कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.
महावितरण गोंदिया भरती वयोमर्यादा
महावितरण गोंदिया भरती अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण आणि कमाल 30 वर्ष असणे आवश्यक आहे. राखीव गटातील उमेदवारांसाठी वयाची अट 05 वर्ष सूट दिलेली आहे.
महावितरण गोंदिया भरती शैक्षणिक पात्रता
महावितरण गोंदिया भरती मध्ये एकूण 85 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार वीजतंत्री, तारतंत्री, कोपा या पदांसाठी भरती प्रकाशित झाली आहे या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता दिलेल्या खालील टेबल मध्ये उमेदवारांनी पदानुसार बघून घ्यायचे आहे महावितरण गोंदिया भरती शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
शिकाऊ पदे | शैक्षणिक पात्रता |
वीजतंत्री, तारतंत्री, कोपा | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10वी आणि आयटीआय बंधातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री,तारतंत्री आणि कोपा या व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
महावितरण गोंदिया भरती वेतन
महावितरण नोंद या भरतीमध्ये वरील पदांसाठी उमेदवारांना शिकाऊ वीजतंत्री, तारतंत्री, कोपा या पदांसाठी नियुक्त उमेदवारांसाठी शासकीय नियमाप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल.
महावितरण गोंदिया भरती अर्ज प्रक्रिया
महावितरण गोंदिया भरती मध्ये अप्रेंटिस पदाकरिता पात्र असलेल्या उमेदवारांनी भरती अर्ज खालील लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी एसएससी आणि आयटीआय गुणपत्रिकेवरच्या नावाशी आधार कार्ड मधले असणाऱ्या नावासोबत जुळणे आवश्यक आहे असे नसणाऱ्या उमेदवारांच्या अर्ज नाकारले जाईल.
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी ऑनलाईन पोर्टलवर लागणारी संबंधित आवश्यक मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करावी दिलेल्या कालावधीतच ऑनलाईन अर्ज सादर न झाल्यास प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करिता उमेदवारांकडे सद्यस्थितीत वापरात सुरू असलेला ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नोंदवणे आवश्यक असणार आहे.
अर्जामधील माहिती चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रासह ऑनलाइन सादर केल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल अर्ज परिपूर्ण भरावा.
आणि अर्जातील दिलेली माहिती खोटी आढळल्यास उमेदवारांना अपात्र ठरवले जाईल.
या उमेदवारांना आरक्षण प्रवर्गातून अर्ज करायचा आहे त्यासाठी कार्यालयाने वेळोवेळी शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षित संबंधित कागदपत्रांची मागणी केल्यास ते सादर करावे लागतील.
या भरतीसाठी यापूर्वीच्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर केले असेल त्यांना प्रणालीमध्ये बदल झाल्याने पुन्हा नव्याने अर्ज करणे आवश्यक असणार आहे अशा उमेदवारांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागतील.
उमेदवारांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे ऑनलाइन अर्ज सादर करावा.
महावितरण गोंदिया भरती लागणारी कागदपत्रे
उमेदवारांनी खाली दिल्याप्रमाणे कागदपत्रे व प्रमाणपत्रे अर्ज करताना सोबत ठेवावी.
- एसएससी आणि आयटीआय ट्रेड ची सर्व सेमिस्टर गुणपत्रिका (मूळ प्रत)
- मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र.
- आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र.
- उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र असल्यास.
- मूळ प्रत उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईल मध्ये स्कॅन करून अपलोड करायची आहे.
Mahavitaran Gondia Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्जाची सुरुवात होण्याची तारीख : 01 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज सादर करावे.
अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे शेवटच्या तारखेनंतर या भरती करिता अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे.
पूर्ण मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्जाची लिंक | अर्ज येथे करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |