MahaGenco Technician Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत रिक्त तंत्रज्ञ -३ या पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.तरी महाराष्ट्र राज्य निर्मिती कंपनीतील रिक्त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत.
भरती जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे. रिक्त पदांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती व इतर आवश्यक माहिती खाली दिलेल्या लेखांमध्ये सविस्तर बघायचे आहे. संपूर्णपणे माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी. महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड भरतीचे अर्ज ऑनलाईन करायचे आहे.मूळ जाहिरातीत मध्ये नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची दिनांक 26 डिसेंबर 2024 आहे.महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये कायमस्वरूपातील नोकरीची उमेदवारांना ही चांगली संधी प्राप्त झालेली आहे.या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि परमनंट नोकरी मिळवावी.नोकरीच्या विविध अपडेट्स पाहण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.freshbharti.com
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.भरती अर्ज फी
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड भरती अर्ज फी खुला प्रवर्गाच्या उमेदवारांना रु.500/- जीएसटी सह आणि मागासवर्गीय प्रवर्ग एससी/एसटी उमेदवारांना अर्ज फी रु.300/- जीएसटी सह लागणार आहे. अर्ज फी बद्दल पुर्णपणे माहितीसाठी पूर्ण मूळ जाहिरात वाचा.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती वयोमर्यादा
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड भरतीमध्ये वय 18 वर्षापेक्षा कमी 38 वर्षापेक्षा जास्त नसावे अशी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे वयोमर्यादामध्ये खालील प्रमाणे सूट देण्यात आलेली आहे.मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादामध्ये 05 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
- दिव्यांग आणि गुणवत्ताधार खेळाडू उमेदवारांसाठी सर्वसाधारण कमाल वय मर्यादा सरसकट 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
- माजी सैनिकांना कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षांची राहील.
- महानिर्मिती कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांना कमाल वयोमर्यादा ही 57 वर्ष राहील.
- प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत खुल्या व मागासवर्गीय उमेदवारांना कमाल वयोमर्यादांमध्ये 45 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे त्यानुसार प्रकल्पग्रस्तांसाठी व भूकंपग्रस्तांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती शिक्षण पात्रता
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती (महानिर्मिती) द्वारे 800 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव तंत्रज्ञ -३ हे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रता बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण मूळ जाहिरात बघू शकता.
संबंधित ट्रेड मधील शासन मान्यता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आय.टी.आय. उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित ट्रेड साठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र NCVT/MCVT. दिलेल्या पदासाठी खालील ट्रेड देण्यात आले आहेत.
1) वीजतंत्री 2) वायरमन 3) मशिनिस्ट 4) फिटर 5) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स /इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 6) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टिम 7) ऑपरेटर कम मेकॅनिक पॉल्युशन कंट्रोल इक्विपमेंट 8) वेल्डर 9) बॉयलर अटेंडन्स 10) स्विच बोर्ड अटेंडन्स 11) स्टीम टर्बाइन ऑक्सीलरी प्लांट ऑपरेटर स्टीम टर्बाइन ऑपरेटर 12) स्विच बोर्ड अटेंडन्स 13) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलॉग इक्विपमेंट 14) ऑपरेटर कम मेकॅनिक पावर प्लांट या ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती अर्ज पद्धत
सदरील भरतीसाठी उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकार येणार आहेत अर्ज करताना शैक्षणिक पात्रतेची किंवा इतर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक नाही ऑनलाईन अर्जात संपूर्ण माहिती भरायचे आहे. पूर्ण अर्ज असल्यास ते नाकारण्यात येईल.
उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर भरती प्रक्रिया शुल्क भरण्या अगोदर तो संबंधित पदासाठी अरहता पूर्ण करत असल्याची खात्री करावी.
भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज अपात्र ठरल्यानंतर उमेदवारांनी भरलेली भरती प्रक्रिया शुल्काची रक्कम परत केली जाणार नाही तसेच इतर कोणत्याही कारणास्तव भरती प्रक्रिया शुल्क परत केले जाणार नाही.
उमेदवारांना अर्जाचे शुल्क भरणे अनिवार्य आहे अर्ज शुल्क भरण्यासाठी ते इंटरनेट बँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड या सुविधेचा वापर करून परीक्षा शुल्क भरू शकतील.
वरील पदासाठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुख्य पृष्ठावर विहित केलेल्या छायाचित्र अपलोड करावयाच्या मानांकानुसार JPEG फाईल सादर करावीत.
तसेच ऑनलाईन अर्ज सादर झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज ची प्रत डाऊनलोड करून अर्जामध्ये उमेदवारांचे छायाचित्र व सहीच्या छायाचित्र योग्य असल्याबाबतची खात्री करावी.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती निवड पद्धत
अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची चाळणी करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. सरळ सेवेअंतर्गत महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रगत कुशल उमेदवारांसाठी अंतिम निवडीसाठी एकूण गुणांपैकी किमान 20% गुणांचा निकष विचारात घेऊन पद भरती प्रक्रिया पार पाडली जाईल. तसेच दिलेल्या परिपत्रकानुसार सदरील पदांची निवड यादी ही ऑनलाइन परीक्षा अंतिम प्राप्त गुणांच्या आधारे तयार करण्यात येईल.
तसेच किमान गुणांची आवश्यकता पूर्ण केल्यानंतर उमेदवारांची गुन्हा अनुक्रमे सामाजिक व समांतर आरक्षणाची निवड यादी तयार करण्यात येईल.
उमेदवारांना ऑनलाइन परीक्षांमध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार तसेच जाहिरातीमध्ये दर्शविण्यात आलेल्या रिक्त जागा नुसार समांतर आणि आरक्षण विचारात घेऊन निवड यादी तयार केली जाईल.
निवड केलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करणे आवश्यक राहील. निवड प्रक्रिये संबंधित माहिती मुळ जाहिरातीत दिली गेली आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंक वरून मूळ जाहिरात वाचावी.
MahaGenco Technician Recruitment Notification 2024
ऑनलाईन अर्जाची सुरु होण्याची तारीख: 26 नोव्हेंबर 2024 ही आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 डिसेंबर 2024 आहे दिलेल्या तारखेच्या आधी इच्छुक असेलेल्या पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावे.