DTP Maharashtra Bharti 2024 : सरकारी नोकरी – नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित!!

DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग पुणे/नाशिक/कोकण/नागपूर/अमरावती/छत्रपती संभाजी नगर/अमरावती अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव कनिष्ठ आरेखक,अणुरेखक असे आहे. या पदाची लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या जाहिरातीत काळजीपूर्वक वाचावी.अधिक माहितीकरिता खालील पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता. महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे.भरतीच्या माहिती पाहण्याकरिता रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या www.freshbharti.com

नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती वयोमर्यादा

वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय अर्ज करण्याच्या रोजी कमीत कमी वय 18 वर्षे पूर्ण आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार खेळाडूंसाठी/आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी/अनाथांसाठी वयोमर्यादा मध्ये पाच वर्ष सूट राहील, तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी अधिक वयोमर्यादा 45 वर्ष एवढे राहील शिवाय अगोदरच शासनाच्या सेवेत असणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा मध्ये दहा वर्ष सुट राहील. मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग व खेळाडू यांना असणाऱ्या वयोमर्यादीतील सूट सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहणार आहे.

नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती अर्ज शुल्क

नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती मध्ये अर्ज करण्यासाठी राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना रुपये 1000/- अर्ज शुल्क लागणार आहे. आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 900/- अर्ज शुल्क लागणार आहे.

नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत पुणे/नाशिक/कोकण/नागपूर/अमरावती/छत्रपती संभाजी नगर/अमरावती मध्ये रिक्त पदांच्या एकूण 154 जागांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव कनिष्ठ आरेखक,अणुरेखक आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करावा.शैक्षणिक पात्रता अर्ज प्रक्रिया महत्वाच्या तारखा याबद्दल अधिक माहिती पाहण्याकरिता उमेदवारांनी खालील पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
अणुरेखकउमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा नंतर मान्यता प्राप्त शासकीय संस्थेतून 02 वर्षांचे आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समकक्ष अर्हता धारण करणारे असावे.
तांत्रिक अर्हता : मान्यताप्राप्त संस्थेकडून स्वयं संगणक सहाय्यित (ऑटोकॅड) किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ आरेखकस्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यातील मान्यता प्राप्त संस्थेची 03 वर्षाची पदविका किंवा सम कक्ष आ अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे उमेदवारांनी खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर क्लिक करून अर्ज सादर करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्या अगोदर सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती घ्या अपूर्ण अर्ज नाकारण्यात येईल अर्ज परिपूर्ण असावा.


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे आणि लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, ओळख प्रमाणपत्र, पासपोर्ट आकारातील फोटो, अर्जदारांची सही अपलोड करणे आवश्यक आहे.

पदाच्या भरतीसाठी विहित दिलेले अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क न भरल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती निवड प्रक्रिया

नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमद्धे देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये निवड प्रक्रियेची माहिती वाचून घ्यायची आहे.

नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती मासिक वेतन

नगररचना मूल्यनिर्धारण विभाग भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- ते 81,100/- रुपये अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते दिले जाईल.

DTP Maharashtra Recruitment Notification Details 2024

ऑनलाईन अर्जाची लिंक सुरूवात होण्याची तारीख : 18 ऑक्टोबर 2024 रोजी पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे अर्ज फक्त ऑनलाईन करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाईल दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सविस्तर मूळ जाहिरात क्र.1येथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरात क्र.2येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक (18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होईल)अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment