BIS Bharti 2024 | BIS- भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत 345 जागांसाठी उमेदवारांना नोकरीची संधी!!

BIS Bharti 2024

BIS Bharti 2024 : भारतीय मानक ब्युरो BIS द्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांची नावे सहाय्यक संचालक वैयक्तिक सहाय्यक, गट A,B,C, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) सहाय्यक CaD, लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक लॅब, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आवश्यकते प्रमाणे वेगवेगळी आहे. पदाप्रमाणे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. भारतीय मानक ब्युरो भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. मूळ जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. भरती अपडेट्स जाणून घेण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.freshbharti.com

भारतीय मानक ब्यूरो अर्ज शुल्क

भारतीय मानक ब्यूरो भरती मध्ये सहाय्यक संचालक (हिन्दी)सहाय्यक वित्त आणि सहायक संचालक पदांसाठी रु. 800/- अर्ज शुल्क असणार आहे आणि इतर उर्वरित पदांकरिता रु.500/- अर्ज शुल्क असणार आहे. अनुसूचीत जाती/जमातीपीडब्ल्यूडी उमेदवार व बीआयएस सेवा कर्मचार्‍यांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
(अर्ज शुल्क ना परतावा असणार आहे)

भारतीय मानक ब्यूरो वयोमर्यादा

भारतीय मानक ब्यूरो मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा पदांनुसार वेगवेगळी दिलेली आहे 27 ते 35 वर्षे वयाची मर्यादा दिली गेली आहे (वयोमर्यादामध्ये 05 वर्षे इतर मागासवर्गीय उमेदवारांना सूट दिली आहे आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेवारांना 03 वर्षे आणि इतर उमेदवारांसाठी सरकारी नियमाप्रमाणे वयोमर्यादा दिलेली आहे मूळ जाहिरात बघा)

भारतीय मानक ब्यूरो शैक्षणिक पात्रता

भारतीय मानक ब्युरो BIS मध्ये रिक्त पदांच्या एकूण 345 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित झाली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे सहाय्यक संचालक वैयक्तिक सहाय्यक, गट A,B,C, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) सहाय्यक CaD, लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक लॅब, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून शैक्षणिक पात्रतानुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.(पूर्ण महितीसाठी दिलेली मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे)

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
सहाय्यक विभाग अधिकारी (ASO)पदवीधर असणे आवश्यक आहे
लघुलेखकपदवीधर असणे आवश्यक आहे
सहाय्यक संचालकसंबंधित क्षेत्रामद्धे पदव्युत्तर
वैयक्तिक सहाय्यकपदवीधर असणे आवश्यक आहे
वरिष्ठ सचिवालय सहाय्यकपदवीधर असणे आवश्यक आहे
सहाय्यक CADडिग्री
कनिष्ठ सचिवालय सहाय्यकपदवीधर असणे आवश्यक आहे
तंत्रज्ञआयटीआय
वरिष्ठ तंत्रज्ञआयटीआय
तांत्रिक सहाय्यक लॅबसंबंधित क्षेत्रातील डिप्लोमा

भारतीय मानक ब्यूरो अर्ज प्रक्रिया

भारतीय मानक ब्यूरो अर्ज ऑनलाईन करण्यासाठी खाली प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्ज नोंदणी
अर्ज शुल्क भरणे
कागदपत्रे स्कॅन आणि अपलोड करणे.

  • अर्ज नोंदणी पूर्ण करण्याआधी उमेदवारांनी खालील मुद्दे लक्षात घ्यावी.
  • अर्ज करण्या अगोदर उमेदवारांची छायाचित्र स्कॅन करा (4.5 cm x 3.5cm)
  • सही कळ्या शाईच्या पेनाने
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा काळया,निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर (उमेदवारांचा डावा अंगठा नसेल तर अर्ज करण्यासाठी उजवा अंगठा वापरू शकतात.)
  • स्व:हस्तलिखित स्वंयघोषणा पत्र.

सर्व स्कॅन केलेली कागदपत्रे आवश्यक तपशील पालन करतात याची खात्री करणे.

स्व:हस्तलिखित स्वंयघोषणा मजकूर

मी,_(उमेदवाराचे नाव) याद्वारे घोषित करतो की माझ्या द्वारे अर्जामध्ये सादर केलेली सर्व माहिती योग्य सत्य आणि वैद्य आहे आवश्यक असेल तेव्हा मी सर्व कागदपत्रे सादर करेल.
वर दिलेली हस्तलिखित घोषणा उमेदवारांच्या हाताने आणि फक्त इंग्रजीमध्ये असावी इतर कोणत्याही भाषेत लिहिलेली अपलोड केल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
दृष्टीने उमेदवारांच्या बाबतीत जे उमेदवार लिहू शकत नाही त्यांनी घोषणेचा मजकूर टाईप करून अपलोड करावा टाईप केलेल्या घोषणेच्या खाली डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा तपशीलनुसार कागदपत्र अपलोड करा.

उमेदवारांकडे एक वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते सुरू ठेवणे आवश्यक आहे आवश्यक आहे.

उमेदवारांना परीक्षा कॉल लेटर इत्यादी डाऊनलोड करण्यासाठीच्या सूचना नोंदणीकृत ईमेल आयडीवर किंवा मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येईल.

अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने पेमेंट भरायचे आहे.
अर्ज नोंदणी खालील प्रमाणे करायचे आहे.
अर्ज नोंदणी साठी उमेदवारांनी BIS वेबसाईटवर जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून नवीन स्क्रीन उघडेल अर्ज नोंदणीसाठी ‘नवीन नोंदणीसाठी’ येथे क्लिक करा टॅब निवडा आणि नाव संपर्क भरा, त्यानंतर ईमेल आयडी वर एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड पाठवला जाईल.

उमेदवारांनी तात्पुरत्या नोंदणीची नोंद घेऊन नोंदणी आणि पासवर्ड दर्शवणारा ई-मेल व एसएमएस सांभाळून ठेवावा.अर्ज एकाच वेळेस भरायचा नसल्यास सेव्ह आणि नेक्स्ट या सुविधेचा वापर करू शकतात.

अंतिम सबमिट केलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक करा आणि माहितीची पडताळणी करा.

अंतिम सबमिशन करण्याआधी सर्व तपशील पडताळा. अर्जदाराचे नाव वडील/ पती इत्यादींचे स्पेलिंग बरोबर असले पाहिजे.

प्रमाणपत्र/ गुणपत्रिका ओळख पुराव्यामद्धे असल्याप्रमाणे नाव असले पाहिजे कोणताही बदल आढळल्यास अर्ज अपात्र ठरेल.

तुमचे तपशील सत्यापित करा आणि सेव वर क्लिक करून अर्ज सेव्ह करा.
मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेल्या वैशिष्ट्याप्रमाणे फोटो व सही अपलोड करण्यासाठी पुढे जाऊ शकतात.

फोटो व सही अपलोड करून अर्जाचे पूर्वावलोकन टॅब वर क्लिक करा आवश्यक असल्यास माहिती सुधारा आणि पडताळणी केल्यानंतरच पूर्ण नोंदणीवर क्लिक करून अर्ज सबमिट करा, तसेच अपलोड केलेले छायाचित्र आणि सही योग्य असल्याची खात्री करून पेमेंट टॅब वर क्लिक करा आणि पेमेंट साठी पुढे जा सबमिट बटनावर क्लिक करून अर्जाची शुल्क भरा.

अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जाची प्रत सांभाळून ठेवा.

भारतीय मानक ब्यूरो निवड प्रक्रिया

उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल कट ऑफ स्कोअर मध्ये
सहाय्यक संचालक (हिंदी), सहाय्यक संचालक (वित्त), सहाय्यक संचालक
मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार सहाय्यक विभाग अधिकारी वैयक्तिक सहाय्यक लघुलेखक वरिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक या पदांकरिता उमेदवारांना एकूण पैकी किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.
तांत्रिक सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक संगणक सहाय्यक डिझाईन या पदांसाठी वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञान उमेदवारांना किमान 50% टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरातीमद्धे निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नमूद केलेली आहे निवड प्रक्रिया पूर्ण पाहण्यासाठी सविस्तर मूळ जाहिरातीसामोरच्या लिंकला क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी)

Bureau Of Indian Standards Recruitment 2024

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरवात होण्याची : 09 सप्टेंबर 2024 पासून अर्ज लिंक सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 च्या आधी अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची नोंद घेवून अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन भरायचे आहे.

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा

Leave a Comment