Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वर्ग- 3 संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक/संशोधन सहाय्यक/उपलेखापाल मुख्यालिपीक-सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नॉनपेसा/वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी/लघुटंकलेखक/गृहपाल स्त्री/गृहपाल पुरुष/अधीक्षक स्त्री/अधीक्षक पुरुष/सहाय्यक ग्रंथपाल/प्रयोगशाळा सहाय्यक/ग्रंथपाल असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रतेची माहिती आणि महत्त्वाच्या दिनांक इत्यादी बद्दल माहिती खालील जाहिरातीत काळजीपूर्वक वाचायची आहे. आदिवासी विकास विभाग नागपूर भरती अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरती विषयक माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.freshbharti.com
आदिवासी विकास विभाग नागपुर भरती अर्ज शुल्क
आदिवासी विकास विभाग नागपूर भरती अर्जाचे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रुपये 900/- आणि खुल्या श्रेणीतील इतर सर्व उमेदवारांसाठी रुपये 1000/- अर्ज शुल्क लागणार आहे.
आदिवासी विकास विभाग नागपुर भरती वयोमर्यादा
आदिवासी विकास विभाग नागपुर भरती वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे.
आदिवासी विकास विभाग नागपुर भरती शैक्षणिक पात्रता
आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 115 जागांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वर्ग- 3 संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक/संशोधन सहाय्यक/उपलेखापाल मुख्यालिपीक-सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नॉनपेसा/वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी/लघुटंकलेखक/गृहपाल स्त्री/गृहपाल पुरुष/अधीक्षक स्त्री/अधीक्षक पुरुष/सहाय्यक ग्रंथपाल/प्रयोगशाळा सहाय्यक/ग्रंथपाल हे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये पदांनुसार बघून पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | मान्यता प्राप्त विद्यापीठातील किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य भीती पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील शिक्षण किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी स्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असल्यास उमेदवारांसाठी प्राधान्य असणार आहे. |
संशोधन सहाय्यक | मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत आहेत, परंतु अर्थशास्त्र/गणित/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांसाठी प्राधान्य राहील. आदिवासी विकास निरीक्षक मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, परंतु पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील |
उपलेखापाल /मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ | मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी, परंतु गणित/ अर्थशास्त्र/आणि ज्यांनी सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्या विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील. |
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही विद्या शाखेतून पदवी उत्तीर्ण असलेले किंवा शासनाने तिच्या समतुल्य असल्याचे घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता असलेले |
लघु टंकलेखक | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समक्ष परीक्षा पास केली असावी आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या आरतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करत असेल. (महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडील प्रमाणपत्र) |
गृहपाल- स्त्री | समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा विकास आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक |
गृहपाल- पुरुष | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारी उमेदवार |
अधीक्षक स्त्री | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतून मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारे उमेदवार |
अधीक्षक पुरुष | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारे उमेदवार. |
ग्रंथपाल | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी ग्रंथालय परीक्षण यामधील शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयाचे किंवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे, परंतु ग्रंथालय शास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान 02 वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना पसंती क्रम राहणार आहे |
सहाय्यक ग्रंथपाल | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यता प्राप्त संस्था किंवा महाविद्यालयातून ग्रंथालय परीक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे. |
प्रयोगशाळा सहाय्यक | ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. |
उच्च श्रेणी लघुलेखक | शासन मान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी परीक्षा पास उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्दप्रतिमिनेट इंग्रजी लघुलेखन परीक्षा पास २) उच्च श्रेणीला लघुलेखक (मराठी) शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट मराठी लागू लेखन परीक्षा पास वरील एक व दोन करता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य 3) टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट 4) टंकलेखन मराठीतील शब्द प्रति मिनिट 5) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातील एम.एस.सी.आय टी. संगणक अर्हता परीक्षा किंवा समक्ष संगणक परीक्षा पास असणे आवश्यक आहे. सदर पदाची व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमाप्रमाणे घेण्यात येईल. |
कॅमेरामन कम -प्रोजेक्टर ऑपरेटर | कॅमेरामन कम -प्रोजेक्टर ऑपरेटर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, जे मान्यता प्राप्तसंस्थेतील फोटोग्राफी या विषयातील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासन मान्य संस्थेमधील फोटोग्राफी, प्रिंटिंग एनर्जी आणि त्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा 03 वर्ष वर्षा पेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षण संस्था/शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे. |
निम्न श्रेणी लघुलेखक | शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक 10 वी एस.एस.सी. परीक्षा पास किंवा 1) लघुलेखक इंग्रजी निम्न श्रेणी शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा पास 2) निम्न श्रेणीला गुलेखक मराठी शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्दप्रतिम मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा पास वरील 01 व 02 करिता इंग्रजी मराठी दोन्ही लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य क) टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट ड) टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट ई) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातील एम एस सी आय टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक परीक्षा पास असणे आवश्यक आहे. या पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमाप्रमाणे घेण्यात येईल. |
आदिवासी विकास विभाग नागपुर भरती अर्ज प्रक्रिया
वरील पदांच्या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे आणि पदांची परीक्षा फी भरावी.
आदिवासी विकास विभाग नागपुर भरती निवड प्रक्रिया
आदिवासी विकास विभाग नागपुर भरती निवड प्रक्रिया माहिती मूळ जाहिरात मध्ये नमूद करण्यात आली आहे पूर्ण महितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात बघावी.
Adivasi Vikas Vibhag Nagpur Bharti Vacancy Details
ऑनलाईन अर्जाची सुरुवात : 12 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत या तारखेच्या आधी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पूर्ण मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे करा अर्ज |