Mumbai Customs Bharti 2024 : मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी पदांकरिता अर्ज प्रक्रिया सुरू!!

Mumbai Customs Bharti 2024

Mumbai Customs Bharti 2024 : मुंबई कस्टम झोन मध्ये नोकरीसाठी जाहिरात प्रसारित केली आहे. ज्यामध्ये गट क अराजपत्रित अ-मंत्रालयीन संवर्ग पदांच्या एकूण रिक्त 44 जागा भरल्या जाणार आहेत. या पदामध्ये मुख्यतः सीमान आणि ग्रीसर यांचा समावेश आहे. जे कस्टम मरीन मध्ये कार्यरत असतील या पदाविषयी पात्र उमेदवारांना https://www.mumbaicustomszone1.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ स्वरूपातील सविस्तर पूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे.निर्धारित पात्रता निकष पूर्ण करणे आणि वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असणे या महत्त्वाच्या पदांसाठी आवश्यक आहे.

या पदांची कार्यक्षेत्र कस्टम प्रतिबंधात्मक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात येतो.अर्ज करण्याची शेवटची दिनांक 17 डिसेंबर 2024 आहे. उमेदवारांनी या संधीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करणे आवश्यक आहे कस्टम्सच्या या क्षेत्रात कार्य करणे खूप महत्त्वाचे आहे कारण नोकरी देशाच्या सीमांना सुरक्षित ठेवण्यास मदत करते यामध्ये सीमानाने ग्रीसर या दोन मुख्य पदांवर काम करण्याची संधी आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील कामकाजात थेट योगदान देता येते. मुंबई कस्टम्स मध्ये काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि ज्ञान असणे महत्त्वाचे आहे सीमान आणि ग्रीसर या पदांसाठी फिजिकल फिटनेसह इतर आवश्यकतेनुसार प्रशिक्षण व अनुभव असणे गरजेचे आहे या पदावर काम करताना उमेदवारांना समुद्री सुरक्षा कस्टमचे नियम आणि विनियम तसेच विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या प्रक्रियांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेत भाग घेणाऱ्या उमेदवारांनी दिलेली खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

मुंबई कस्टम्स विभाग भरती अर्ज शुल्क

मुंबई कस्टम्स विभाग भरती मध्ये अर्जाचे कोणतेही शुल्क लागणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्ज करण्याचे शुल्क आकरण्यात येणार नाही.

मुंबई कस्टम्स विभाग भरती वयोमर्यादा

मुंबई कस्टम्स विभाग भरती वयाची मर्यादा 18 ते 25 वर्ष दिलेली आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी /एसटी 05 वर्ष आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना 03 वर्ष सवलत दिली गेली आहे.आणि केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना 40 ते 45 वयोमर्यादा आहे.(वयोमर्यादाची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात बघावी)

मुंबई कस्टम्स विभाग भरती शैक्षणिक अर्हता

मुंबई कस्टम्स अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 44 जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव अराजपत्रित/अ-मंत्रालयीन संवर्ग हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक अर्हताबद्दल पूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचायची आहे.

मुंबई कस्टम्स विभाग भरती मासिक वेतन

मुंबई कस्टम्स विभाग भरतीमध्ये जाहिरातीत नमूद पदांसाठी नियुक्त उमेदवारांना 18,000/- ते 56,900/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

मुंबई कस्टम्स विभाग भरती अर्ज पद्धत

उमेदवारांनी अर्जावर एक अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवला पाहिजे जो उमेदवारांनी स्वाक्षरी केलेला असावा फोटोमध्ये चेहरा स्पष्टपणे दिसायला हवा.

उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. अर्ज करताना सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे जोडावी.

अपूर्ण आणि स्वाक्षरी न केलेले किंवा फोटो व आवश्यक कागदपत्रांशिवाय आलेले अर्ज लगेच रद्द करण्यात येईल.
उमेदवारांनी अर्जामध्ये भरलेली माहिती योग्य आहे याची खात्री करणे आवश्यक आहे आवश्यक प्रमाणपत्र न दिल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.

आरक्षित जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्र सादर करावे लागेल अन्यथा त्यांचा अर्ज रद्द केला जाईल.

अर्ज दिलेल्या विहित नमुन्यातच परिपूर्ण भरायचा आहे व खालील पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त पी आणि ई मरीन 11 वा मजला, नवीन कस्टम हाऊस बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001 या अर्ज पत्त्यावर पाठवायचा आहे.

मुंबई कस्टम्स विभाग भरती निवड प्रक्रिया

मुंबई कस्टम्स विभाग भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता (PET) आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे करण्यात येईल. लेखी परीक्षा,PET किंवा कागदपत्रे पडताळणीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता देण्यात येणार नाही. निवड प्रक्रियेबद्दल पूर्णपणे माहिती मूळ जाहिरातीत दिली गेली आहे. संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील पूर्ण मूळ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून बघू शकता.

Mumbai Customs Recruitment Notification 2024

ऑफलाईन अर्जाची सुरुवात होण्याची दिनांक : 04 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 30 डिसेंबर 2024 आहे. इच्छुक आणि पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज पाठवायचे आहे.

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
पुर्ण मूळ जाहिरात येथे पहा

Leave a Comment