Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये असलेल्या पदांच्या भरतीसाठी सरळसेवा नोकरभरती 2024-25 अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे.शिपाई/पहारेकरी, सुरक्षारक्षक, गेटमन, माळी, सफाईगार असे आहे.
या पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. खालील जाहिरातीमध्ये पदसंख्या, वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व प्रवर्गानुसार रिक्त पदांची संख्या बघण्यासाठी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 9वी,10वी पास उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि नोकरी मिळवावी. भरतीच्या अपडेट्स बघण्याकरिता आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.freshbharti.com
कृषि उत्पन्न बाजार समिती अर्ज शुल्क
कृषि उत्पन्न बाजार समिती भरतीमध्ये अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असल्याने उमेदवारांना पदांच्या भरतीचे अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
कृषि उत्पन्न बाजार समिती वयोमर्यादा
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. (पूर्ण माहिती बघण्यासाठी मुळ जाहिरात वाचावी)
कृषि उत्पन्न बाजार समिती शैक्षणिक पात्रता
कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर मध्ये रिक्त पदांच्या एकूण 10 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिपाई/पहारेकरी, सुरक्षारक्षक, गेटमन, माळी, सफाई कामगार असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदांनुसार बघायचे आहे व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे.अनुभव आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर पूर्ण जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
पदांचे नाव | लागणारी शैक्षणिक पात्रता |
शिपाई/पहारेकरी | 10वी उत्तीर्ण |
सुरक्षारक्षक | 10वी उत्तीर्ण |
गेटमन | 10वी उत्तीर्ण |
माळी | 10वी उत्तीर्ण |
सफाई कामगार | 09वी उत्तीर्ण |
कृषि उत्पन्न बाजार समिती अर्ज प्रक्रिया
कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता, जि. अहमदनगर मध्ये भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वतः पोहोचवायचे आहेत, अर्ज पाठवण्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे.
अर्जासोबत लागणारी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे जोडायची आहे आणि अर्जामध्ये स्वतःचे नाव शैक्षणिक पात्रता, उमेदवारांचा रहिवासी पत्ता संपर्क तपशील आणि ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे स्पष्टपणे ठळक अक्षरात नाव लिहायचे आहे.
अर्जातील माहिती खरी व अचूक असावी संपर्क तपशील माहिती अचूक भरावी, निवड प्रक्रिया आणि भरती प्रक्रियेच्या इतर सर्व सूचना उमेदवारांना त्यांच्या संपर्क तपशील द्वारे कळविण्यात येणार आहे.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता, पोस्ट साकुरी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर पिनकोड 423107 या पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखेआधी पाठवायचे आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 दिलेली आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती भरती शैक्षणिक पात्रता व लागणारी इतर कागदपत्रे
- इयत्ता 9वी, 10वी,12वी, पदवी, पदव्युत्तर गुणपत्रक व प्रमाणपत्रे.
- संगणक अर्हता एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र.
- अनुभव प्रमाणपत्र.
- वर्तणुकीचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- ज्या उमेदवारांना बाजार समितीमध्ये काम करण्याचा अनुभव आहे त्यांच्या वयोमर्यादेमध्ये शितलता आणि प्राधान्य देण्याचा अधिकार संचालक मंडळाने राखून ठेवलेला आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती निवड प्रक्रिया
कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर मध्ये पदांच्या नियुक्तीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
लेखी परीक्षेची वेळ, दिनांक आणि ठिकाण याबद्दल उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सॲप/ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
कृषि उत्पन्न बाजार समिती परीक्षा अभ्यासक्रम
उमेदवारांना लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम
१)मराठी व्याकरण,इंग्रजी व्याकरण २) अंकगणित ३) जनरल नॉलेज ४) कृषी संबंधित पदाच्या अनुषंगाने सामान्य ज्ञान.
Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Bharti Vacancy Details
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख – 25 सप्टेंबर 2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज पाठवून द्यायचे आहे शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही अर्थात अर्ज रद्द ठरविण्यात येईल.
अर्ज या पत्त्यावर पाठवायचा आहे : कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता, पोस्ट साकुरी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर पिनकोड 423107
पूर्ण मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |